कोरोनात हरवत चाललेली माणुसकी

कोरोनात हरवत चाललेली माणुसकी

Mrs. Rohini Gurav
AISSMS Polytechnic, Pune

नमस्कार मित्रांनो !!!

दैनंदिन धावपळीच्या आयुष्यात आपण मग्न असताना चीन मधून अचानक कोरोना नावाचा विषाणू आला… आणि बघता-बघता गरीब श्रीमंत सर्वांचे आयुष्य त्याने ठप्प केले…

गेले वर्षभर आपण कोरोनात काय करावे अन्काय करू नये, स्वतःची काळजी कशी घ्यावी, काय खावे अन्काय खावू नये हे बघतोय, वाचतोय, आणि ऐकतोयही..कोरोना हा संसर्गजन्य रोग असल्यामुळे सामाजिक अंतर ठेवणे, तोंडा लामास्क लावणे हे उपाय करता करता आपण एकमेकांशी मनाने अंतर तर ठेवू लागलो नाही ना? असा प्रश्न भेड सावयाला लागला आहे.

कोरोनाशी लढण जितकं महत्वाचं आहे तितकंच एकमेकांना मानसिक बळ देणं, साथ देणं महत्त्वाचं आहे. असं वाटतंय कि कोरोना सोबत लढताना नकळत आपण आपली माणुसकी तर बाजूला ठेवत नाही ना ?

जसा कोरोना आपल्या मायभूमीत शिरला तसे आपण एकमेका पासून दूर गेलो. पण लक्षात घ्यायला हवं कि कोरोना संसर्गजन्य रोग असल्यामुळे सामाजिक अंतर गरजेचे असले तसे ते शरीराचे…. मनाचे अंतर नाही.. गेली वर्षभर कित्येक लोक कोरोना बधित झाली आहेत, त्या पार्श्वभूमीवर आपण सर्वांनी त्यांना मदतीचा हात देण्याऐवजी त्यांच्यावर बहिष्कारच टाकला.

आपला देश संस्कार जपणारा समजला जातो. आपण विसरलोय कि ज्यांलोकांना कोरोना झाला व सध्या झालाय ते आपल्याच देशातील, आपल्याच राज्यातील नव्हे आपल्याच शहरातील आहेत. ते काही कोरोनग्रस्त देशातून आले नाहीत की त्यांना परके करून वाळीत टाकायला.

कोरोना झाला म्हणजे कोणतातरी अक्ष्यम गुन्हा केल्या सारखे लोक एकमेकांच्या मध्ये कुजबुज करतत्या कुटुंबाला वाळीत टाकतात. त्या कोरोनग्रस्त रोग्याच्या तुटलेल्या मनाचा विचार न करता त्यांच्या पासून दूर कसे जाता येईल हे पाहत असतात. त्या रोग्याला जाणवेल इतके परके करतोय हा समाजत्यांना. ओरडून सांगावेसे वाटते कि, अरे तो मनुष्य संसर्गज न्यरोगाने पीडित आहे, कोणी खुनी दरोडेखोर नाही त्याच्यासोबत संबंध तोडायला.

काही वेळेस कोरोना झालेल्याना होम quarantine केलेजाते, ते बाहेर पडू शकतं नाहीत, अशा वेळी सामाजिक अंतर ठेवून आपण त्यांना लागेल ती मदत करायला हवी. जसे की, त्यांना डॉक्टरांनी सांगितलेली औषधे मेडिकल मधून आणून देणे, दैनंदिन जीवनात लागणाऱ्या वस्तू आपण हातात नाही पण दरवाजापर्यं ततरी नेवून देवू शकतो.. पण नाही आम्ही अफवावर विश्वास ठेवून त्या व्यक्ती च्या घराच्या आसपास पण फिरकत नाही..

कोरोना मुळे मृत्यूचे प्रमाण किती आहे या पेक्षा भीती मुळे मृत्यु झालेल्याची संख्या जास्त आहे. कारण ही भीती अनेकदा कोरोना मुळे होणाऱ्या मृत्यु पेक्षाही भयंकर आहे. जास्त वाईट याचे वाटते की या संकटकाळात भीतीमुळे मानवता, माणुसकी यांचा पराभव होताना दिसत आहे. आपण आपल्याच माणसांच्या मदतीला धावून न जाता जाणीवपूर्वक पाठ फिरवताना दिसत आहोत.. ही भीती इतकी वाढली आहे की माणूस माणसाला घाबरायला लागला आहे.. एकमेकाना आपण Biological Bomb म्हणून पाहू लागलो आहोत. भीतीच्या या छायेत आपण इतर सर्वांनाच कोरोना पसरवणारे संभाव्य शरीर म्हणून पाहू लागलो आहोत. कोरोना नसेल आणि एखादे viral infection असेल तरी आपण एकमेकांशी बोलणे बंद केले आहे… ‘माणसाने माणसाशी माणसासारखे वागावे’ हेच मुळी आपण विसरून गेलोय.

या काळात माणुसकी हीच सर्वात महत्त्वाची आहे कारण पीडितांना प्रेम दिल्याने त्यांच्यात ऊर्जा वाढते जी त्यांना आजाराशी लढायला मदत करते, त्या कुटुंबाचे मनोबल वाढवते.

लक्षात ठेवा, आपला मदतीचा विश्वास कोणाचे तरी आयुष्य वाचवू शकतो. म्हणून सर्वांना विनंती करते कि , कोरोना झालेल्याना वाळीत न टाकता सामाजिक अंतर ठेवून, मास्क वापरून त्यांना माणुसकी दाखवून ही कोरोनाविरूध्दची लढाई जिंकायला मदत करूया.. कितीही संकटे आली तरी संयम, जिद्द आणि सहकार्याचे आव्हान करताना एवढेच म्हणेन,

 

“छोडो कल की बाते, कल की बात पुरानी,

नये दौर में लिखेंगे, मिलकर नयी कहानी,

हम हिंदुस्तानी!!! हम हिंदुस्तानी!!!”