Free Admission Counselling and Facilitation Center (D-6415)
Contact admission counsellors on below numbers
+91 20 26059147 |+91 20 26058077 |+91 20 26058287

Happy students!

विद्यार्थ्यांनो मन ठेवा प्रसन्न!

Mrs. Gauri Despande
AISSMS Polytechnic, Pune

आज जगभरातील सगळे विद्यार्थी एका विचित्र परिस्थितीतून जात आहेत. गुरू-शिष्याच्या नात्यात जागतिक महामारीने अंतर तर आणलेच शिवाय काही प्रमाणात शिक्षणाच्या संधीही कमी केल्या. प्रात्यक्षिक शिक्षणाअभावी घेतलेले ज्ञान अपुरे वाटू लागले आहे. एक पालक आणि शैक्षणिक क्षेत्रात काम करत असल्याने एक शिक्षक म्हणून विद्यार्थ्यांची ही मानसिक अवस्था मी अनुभवतेय. पण विद्यार्थी मित्रांनो माझा एक सल्ला आहे तुम्हाला, की स्वतःच्या मनाला जपा. नैराश्याची, अगतिकतेची जळमटे मनावर चढू देऊ नका. तुमच्या अभ्यासातले सातत्य, रसपूर्ण ग्रहण आणि स्वयम् अध्ययनाची सवय याने तुम्हाला विषयात पारंगत होण्यास मदत होईल. उपलब्धअसलेल्या सुविधांचा योग्य वापर केल्यास प्रात्यक्षिक शिक्षणाचाही अनुभव घेता येईल. स्वतःच्या आवडीचा छंद जोपासणे, एखादी कला शिकणे यानेही मानसिक आरोग्य सुधारते. निरोगी मनाला निरोगी शरीराची साथ हवी. पौष्टिक सात्विक आहार आणि योग्य व्यायाम निरामय आयुष्याचे दरवाजे उघडतो. स्वतःप्रमाणेच कुटुंबीयांची ही काळजी घ्या. खूप काही नाही, पण घरातल्या हलक्या जबाबदारीने आणि सुसंवादाने वातावरण प्रसन्न राहते.

सर्वात शेवटी पण महत्त्वाचे, सामाजिक बांधिलकी जपत पर्यावरणाचेही रक्षण करा.

मला एक शास्त्रीय नियम माहित आहे की ऊर्जा निर्माण करता येत नाही. पण विद्यार्थी मित्रहो आपण येथे नैराश्याला आणि कोरोनाला हरवण्यासाठी आपल्या आचार विचारातून सकारात्मक ऊर्जा तयार करूया.