Free Admission Counselling and Facilitation Center (D-6415)
Contact admission counsellors on below numbers
+91 20 26059147 |+91 20 26058077 |+91 20 26058287

दहावीनंतरच्या अभियांत्रिकी पदविका या अभ्यासक्रमाचे महत्व

Shri. Surendra Giram,

Principal

AISSMS’s Polytechnic, Pune 

 

अभियांत्रिकी पदविका / पॉलिटेक्निक हा दहावी तसेच बारावी / आयटीआय नंतर चा एक महत्त्वाचा व्यावसायिक अभ्यासक्रम असून सदर अभ्यासक्रमासाठी बरेच विद्यार्थी दरवर्षी प्रवेश घेत असतात.
अभियांत्रिकी पदविका हा अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना मूलभूत तसेच प्रात्यक्षिक ज्ञान मिळणेकामी अत्यंत महत्वाचा समजला जातो. पदविका अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर विद्यार्थी थेट द्वितीय वर्ष अभियांत्रिकी
साठी प्रवेश घेण्यासाठी पात्र ठरतात. तसेच औद्योगिक क्षेत्रांमधून पदविका प्राप्त विद्यार्थ्यांना मोठी मागणी असते.हा अभ्यासक्रम पूर्ण केलेनंतर विद्यार्थ्यांना खाजगी त्याचप्रमाणे सरकारी क्षेत्रांमध्ये कनिष्ठ अभियंता / निरीक्षक म्हणून नोकरी मिळू शकते.

महाराष्ट्रामधील अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रमाच्या संस्था या महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ[MSBTE] मुंबई यांच्याशी संलग्न आहेत. महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाने विविध शैक्षणिक तसेच उद्योगक्षेत्रांमधील तज्ञांशी विचार विनिमय करून प्रत्येक विषयाचा अभ्यासक्रम तयार केलेला आहे. प्रत्येक अभियांत्रिकी शाखेतील विविध विषयांच्या थेअरी व प्रात्यक्षिका बरोबरच मायक्रोप्रोजेक्टचा सुद्धा अंतर्भाव करण्यात आला असल्यामुळे विद्यार्थ्यांना प्रकल्प व्यवस्थापन तसेच सांधिक कौशल्य विषयक प्रशिक्षण मिळण्यास मोठी मदत होते. त्याचप्रमाणे द्वितीय वर्ष पूर्ण झाल्यावर विद्यार्थ्यांना सहा आठवड्यासाठी विविध उद्योगांमध्ये प्रशिक्षण पूर्ण करण्यासाठी पाठवण्यात येते. सदर प्रशिक्षणाचा उपयोग विद्यार्थ्यांना भविष्यात नोकरी तसेच स्वतःचा व्यवसाय करण्यासाठी होतो. तसेच अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमांमध्ये सांधिक प्रकल्पाचा अंतर्भाव करण्यात आल्यामुळे विद्यार्थ्यांचे तांत्रिक तसेच सांधिक कौशल्य वाढवण्याकामी मोठी मदत होते. वरील सर्व बाबीचा विचार करता अभियांत्रिकी पदविका शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित होत असल्यामुळे औद्योगिक क्षेत्राकडून पदविकाधारक विद्यार्थ्यांना नोकरीमध्ये नेहमीच प्रोत्साहन व प्राधान्य दिले जाते. त्यामुळे भविष्यात पदविका अभियांत्रिकी शिक्षणाचे महत्त्व हे वाढत राहणार आहे.

अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रम हा खालील विविध शाखेमध्ये उपलब्ध आहे

सिव्हिल इंजिनिअरिंग या अभियांत्रिकी शाखेमध्ये इंजिनिअरिंग ड्रॉईंग, कंस्ट्रक्शन इंजिनिअरिंग, बिल्डिंग मटेरियल, सर्व्हे, स्ट्रक्चरल इंजिनिअरिंग, एन्व्हायरमेंटल इंजीनियरिंग इत्यादी विषयांचा अंतर्भाव आहे.

मेकॅनिकल इंजिनिअरिंग या अभियांत्रिकी शाखेमध्ये इंजीनियरिंग ड्रॉईंग, मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेसेस, थेअरीऑफ मशीन, फ्लुईड मेकॅनिक्स , मशीन डिझाईन, अप्लाइड मेकॅनिक्स, रेफ्रिजरेशन अँड एअर कंडिशनिंग, मेट्रोलॉजी अँड क्वालिटी कंट्रोल, ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग, पॉवर इंजिनिअरिंग इत्यादी विषयाचा अंतर्भाव केला आहे.

कॉम्प्युटर इंजीनियरिंग अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी मध्ये ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग , डेटा स्ट्रक्चर, डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीम, डिजिटल टेक्निक्स, जावा प्रोग्रामिंग, सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग, मोबाईलॲप्लिकेशन डेव्हलपमेंट, इमर्जिंग ट्रेंडस इन कॉम्प्युटर अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी इत्यादी विषयाचा अंतर्भाव केला आहे.

इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन या अभियांत्रिकी शाखेमध्ये कंझ्युमर इलेक्ट्रॉनिक्स, मायक्रोकंट्रोलर अँड अँप्लिकेशन्स, लीनियर इंटिग्रेटेड सर्किट. बेसिक पॉवर इलेक्ट्रॉनिक्स, मॅनेजमेंट ऑफ इलेक्ट्रॉनिक इक्विपमेंटस, डिजिटल कम्युनिकेशन सिस्टम, नेटवर्क अँड सॅटेलाइट कम्युनिकेशन, कम्प्युटर नेटवर्क अँड डेटाकम्युनिकेशन, इमर्जिंग ट्रेंडस इन इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग या विषयाचा अंतर्भाव केला आहे.

ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग या अभियांत्रिकी शाखेमध्ये ऑटोमोबाईल मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेसेस, ऍडव्हान्स ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग, हीट पॉवर इंजिनिअरिंग, मेकॅनिकल मॅनेजमेंट, सॉलिड मॉडेलिंग, ट्रान्सपोर्ट मॅनेजमेंट, ऑटो कॉम्पोनन्ट्स डिझाईनिंग, टू अँड थ्री व्हीलर टेक्नॉलॉजीस इत्यादी विषयांचा अंतर्भाव केला आहे.

इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग – इलेक्ट्रिकल सर्किट्स, इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स मेजरमेंटस, इलेक्ट्रिकल पावर जनरेशन, इलेक्ट्रिकल मटेरियल अँड वायरिंग प्रॅक्टिस, इलेक्ट्रिकल मोटर अँड ट्रान्सफॉर्मर्स, इलेक्ट्रिकल पावर अँड डिस्ट्रीब्यूशन, स्विच गिअर अँड प्रोटेक्शन, एनेर्जी कन्सर्वेशन अंड ऑडिट, इलेक्ट्रॉनिक्स ॲप्लिकेशन, मेन्टेनन्स ऑफ इलेक्ट्रिकल इक्विपमेंट, इमर्जिंग ट्रेंड्स इन इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग इत्यादी विषयांचा अंतर्भाव आहे.

केमिकल इंजिनिअरिंग या शाखेमध्ये प्लांट युटिलिटीज, प्लांट इकॉनॉमिक्स अँड एनर्जी मॅनेजमेंट, केमिकल इंजीनियरिंग थर्मो डायनामिक्स, केमिकल प्रोसेस इंस्त्रुमेंटेशन अँड कंट्रोल, फ्लुईड फ्लो ऑपरेशन, केमिकल
रिएक्शन इंजीनिअरिंग, मेंब्रेन टेक्नॉलॉजी, इमर्जिंग ट्रेंड्स इन केमिकल इंजिनिअरिंग इत्यादी विषयांचा अंतर्भाव केला आहे.

आर्टिफिशिअल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग या अभियांत्रिकी शाखेमध्ये डाटा स्ट्रक्चर युजिंग पायथोन, स्टोरी टेलिंग अँड व्हिज्वलायझेशन, मॅथेमॅटिक्स फोर मशिन लर्निंग, जावा प्रोग्रामिंग फंडामेंटल, एमएल अँड एआय अल्गोरिदम, क्लाऊड कम्प्युटिंग फॉर डेटा इंजिनिअरिंग, बिग डेटा एनालीटीक्स, इमर्जिंग ट्रेंड्स इन कॉम्प्युटर अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी इत्यादी विषयाचा अंतर्भाव केला आहे.

अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रमासाठी लागू असलेल्या प्रमुख शिष्यवृत्ती

राजश्री शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजना (ईबीसी): तंत्रशिक्षण विभागातर्फे देण्यात येणार्‍या या शिष्यवृत्तीचे उद्दिष्ट केंद्रीय प्रवेश प्रक्रिया द्वारे डिप्लोमा व्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रवेश घेणाऱ्या आर्थिक मागास वर्गीयांना आर्थिक सहाय्य प्रदान करणे हा आहे
लाभ: ट्युशन फीच्या आणि परीक्षा फीच्या ५०%.
पात्रता निकष: कुटुंबाचे / पालकाचे एकूण वार्षिक उत्पन्न आठ लाखापेक्षा जास्त नसावे.

VJNT व SBC विद्यार्थ्यांसाठी ट्युशन फी व एक्झामिनेशन फी योजना: समाजकल्याण विभागाने जाहीर केलेल्या या योजनेअंतर्गत VJNT व SBC प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आर्थिक सहाय्य प्रदान करणे, उच्च शिक्षणाची आवड निर्माण करणे, विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या माध्यमातून शिक्षणाच्या प्रमुख प्रवाहात जाण्याची संधी उपलब्ध करून देणे या उद्दिष्टाने शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्क दिले जाते.
लाभ: १००% शिक्षण आणि परीक्षा शुल्क.
पात्रता निकष: कुटुंबाचे / पालकाचे एकूण वार्षिक उत्पन्न आठ लाखापेक्षा जास्त नसावे.

ओबीसी विद्यार्थ्यांसाठी ट्युशन फी व एक्झामिनेशन फी योजना: समाज कल्याण विभाग विभागातर्फे देण्यात येणाऱ्या या योजनेअंतर्गत ओबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी अर्थ सहाय्य प्रदान करणे उच्च शिक्षणाची आवड निर्माण करणे विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या माध्यमातून शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात जाण्याची संधी उपलब्ध करून देणे या उद्देशाने शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्क यामध्ये सवलत दिले जाते
लाभ: ५०% शिक्षण आणि परीक्षा शुल्क.
पात्रता निकष: कुटुंबाचे / पालकाचे एकूण वार्षिक उत्पन्न आठ लाखापेक्षा जास्त नसावे.

पोस्ट मॅट्रिक ट्युशन फीस आणि एक्झामिनेशन फीस (फ्रीशिप): सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य या विभागातर्फे देण्यात येणाऱ्या या योजनेअंतर्गत SC प्रवर्गातील विद्यार्थ्यांना विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाची आवड निर्माण करणे, उच्च शिक्षणासाठी आर्थिक सहाय्य उपलब्ध करून देणे, शैक्षणिक गळतीचे प्रमाण कमी करणे, उच्च शिक्षणाचा द्वारे आर्थिक वाढीच्या संधी निर्माण करणे या उद्देशाने शिक्षण शुल्क आणि परीक्षा शुल्क दिले जाते.
लाभ: शिक्षण तसेच परीक्षा शुल्क आणि इतर शुल्क जे विद्यार्थ्यांने संस्थेला अनिवार्य किंवा सक्तीचे देय आहेत.
पात्रता निकष: कुटुंबाचे/ पालकाचे एकूण वार्षिक उत्पन्नाची मर्यादा नाही.

व्होकेशनल एज्युकेशन फी रिम्बर्समेंट: आदिवासी विकास विभागातर्फे देण्यात येणाऱ्या या योजनेअंतर्गत ST प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शिक्षण शुल्क आणि परीक्षा शुल्क दिले जाते.
लाभ: १००% शिक्षण आणि परीक्षा शुल्क.
पात्रता निकष: कुटुंबाचे पालकाचे एकूण वार्षिक उत्पन्नाची मर्यादा नाही.

उच्च व्यावसायिक शिक्षण घेणाऱ्या स्टेट मायनॉरिटी कम्युनिटी विद्यार्थ्यासाठी स्कॉलरशिप योजना: अल्पसंख्याक विकास विभागातर्फे अल्पसंख्याक समुदायातील (मुस्लिम, बौद्ध, ख्रिश्चन, शीख, पारशी, जैन आणि ज्यू समुदाय) गुणवंत विद्यार्थ्यांना व्यावसायिक आणि तांत्रिक शिक्षण अभ्यासक्रमाचे शिक्षण घेण्यास सक्षम करण्यासाठी आर्थिक सहाय्य प्रदान करणे हा या योजनेचा उद्दिष्ट आहे.
लाभ: शिष्यवृत्तीची रक्कम कमाल रुपये २५०००/- वार्षिक किंवा वास्तविक शिक्षण शुल्क यापैकी जे कमी असेल ते.
पात्रता निकष: कुटुंबाचे / पालकाचे एकूण वार्षिक उत्पन्न आठ लाखापेक्षा जास्त नसावे.

आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक(EWS): ज्या कुटुंबाचे / पालकाचे वार्षिक कौटुंबिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी आहे आणि जे राखीव प्रवर्गातील नाहीत त्यांना या आरक्षणाचा फायदे घेता येतात.
लाभ: १०% आरक्षण तसेच ५० टक्के शिक्षण शुल्क आणि परीक्षा शुल्क.
पात्रता निकष: कुटुंबाचे / पालकाचे एकूण वार्षिक उत्पन्न आठ लाखापेक्षा जास्त नसावे.

ट्युशन फी व्हेवअर स्कीम: चांगले गुण मिळालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांसाठी ही प्रत्यक्षात आर्थिक मदत आहे या योजनेअंतर्गत शिक्षण शुल्क पूर्ण माफ करण्यात येते.
लाभ: १००% शिक्षण शुल्क.
पात्रता निकष: कुटुंबाचे / पालकाचे एकूण वार्षिक उत्पन्न आठ लाखापेक्षा जास्त नसावे.